राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून राज्यभरात सुरुवात झाली आहे. यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. 12 बालकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता कापसी येथे पोलिओ लसीकरणा चा कार्यक्रम भांबोरा Psc मार्फत राबविण्यात आला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे गावातील 12 मुलांना पोलिओ च्या जागी सॅनिटाइजर पाजण्यात आले. काही तासा नंतर 3 ते 4 मुलांना उलट्या झाल्या. तातडीने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.
मुलांना लस म्हणून सॅनिटीझर पाजण्यात आले हे केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने त्या सर्वांना पोलिओ लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली गेली नव्हती, असं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. संपूर्ण प्रकार गंभीर असून यात कोणाकडून ही चूक झाली याची चौकशी सुरू आहे. ज्यावेळी मुलांना लस देण्यात आली त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजार होते. तिघांपैकी कुणाकडून ही चूक झाली याचा तपास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी करत आहेत.