पुजा चव्हान आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस वळण घेत आहे. पुजा चव्हानच्या आत्महत्येमागे महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्याचे नाव समोर येत असल्यामुळे भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपाच्या प्रदेश ऊपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत कारवाईची मागणी केली होती. ईतर भाजप नेत्यांकडूनसुद्धा संजय राठोड यांच्या राजिनाम्याची मागणी करत त्यांची चौकशी करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. अखेर संजय राठोड यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांकडे वनमंत्री पदाचा राजीनामा सुपुर्द केला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
संजय राठोड यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतरसुद्धा भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे. “वनमंत्री संजय राठोड यांनी पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवावा. ‘कारण एकाने मारल्यासारखे आणि दुसर्याने रडल्यासारखे होता कामा नये’ राजीनामा दिल्यानंतरसुद्धा निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.” असे प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पुजा चव्हानच्या आत्महत्येनंतर काही अॉडिअो क्लीप्स व्हायरल झाल्या होत्या. या क्लीपवरुन संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. पुजा चव्हान ही टीकटॉक स्टार होती. तसेच तीला राजकीय क्षेत्रात आवड असल्याचीसुद्धा माहिती मिळते. संजय राठोड शिवसेनेचे दिग्रस मतदारसंघाचे आमदार आणि वनमंत्री आहे. पुजा चव्हान आणि संजय राठोड यांचे काही फोटसुद्धा सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. संजय राठोड यांनी अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता थेट त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान पुजा चव्हान हीच्या वडिलांनी आपली कुणाविरुद्धही तक्रार नाही अशी भूमिका घेतली आहे. आमची कुणाविरुद्ध तक्रार नाहीये. “आमची अगोदरच खुप बदनामी झाली आहे. आम्हाला अजून बदनाम करु नका,” असे पुजाचे वडिल लहू चव्हान यांनी माध्यमांशी बोलतांना मांडले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.