संजय राठोड मंत्रीपदावर कायम? अद्यापही राठोडांचा राजिनामा मुख्यमंत्र्यांकडेच

26

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांत नाव पुढे आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी(दि.२८ फेबृ) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचून मंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत हा राजिनामा राज्यपाल यांचेकडे सुपुर्द केलेला नाही. परिणामी संजय राठोड मंत्रीपदावर हे अजूनही वनमंत्री या पदावर विराजमान आहे. त्यामुळे संजय राठोड हे मंत्रीपदावर कायम असणार का? अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर राजिनामा हा मुख्यमंत्र्यांचा राजकीय गेम होता का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

पुजा चव्हान या तरुणीने पुणे याठिकाणी आत्महत्या केली होती. त्यानंतर व्हायरल झालेल्या अॉडिअो क्लीपवरुन आणि काही सोशल मिडिवारील फोटोवरुन वनमंत्री संजय राठोड यांचा या आत्महत्येमागे हात आहे. असे बोलले जात होते. त्यानंतर भाजपने हा मुद्दा ऊचलून धरत महाविकासआघाडी सरकारवर दबाव आणला आणि संबंद्धित प्रकरणांत योग्य कारवाईची मागणी केली. भाजप प्रदेश ऊपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राठोड वर थेट आरोप करत राजिनाम्याची मागणी केली. त्यानंतर भाजपच्या महिला मोर्चानेसुद्धा याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.

या मुद्द्यावरुन अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता होती. भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसा राज्य सरकारला ईशारासुद्धा दिला होता. परिणामी संजय राठोड यांचा राजिनामा मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनोि घेतला. मात्र त्यानंतर तीन दिवसांचा कालावधी लोटला असूनदेखील तो राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर राजकीय चष्म्यातून संशय व्यक्त केला जात आहे.

कशी आहे राजिनाम्याची प्रक्रिया?
मुख्यमंत्री यांचेकडे एखाद्या मंत्र्याने राजिनामा दिल्यास, मुख्यमंत्री कार्यालयाला तो राज्यपालांकडे पाठवावा लागतो. त्यानंतर राज्यपाल राजिनामा स्विकारतात आणि मग संबंद्धित मंत्री मंत्रीपदावरुन हद्दपार होतो. त्यानंतर एक नोटीफीकेशन काढले जाते, ज्यामध्ये पुढील पदभार कोण स्विकारणार व ईतर माहिती दिलेली असते. राज्यसरकारकडून राज्यपालांकडे राजिनामासुद्धा पाठवण्यात आलेला नाही. तसेच नोटीफीकेशनसुद्धा काढण्यात आलेले नाही.