बलात्कारी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री बसत आहेत ही लाजिरवाणी बाब असल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केलाय. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांवरही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.
पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल केलेला अहवाल ही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात केलेली धुळफेक असल्याचंही चित्रा वाघ मंगळवारी म्हणाल्या होत्या.
भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडले पाहिजे.असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ज्या दोन तरुणांना जुजबी चौकशी करुन सोडून देण्यात आलं.त्यापैकी एकही तरुण पोलिसांच्या ताब्यात नाही. पोलिसांनी या तपासात संपूर्णपणे दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे .
राज्य सरकारमध्ये सध्या बलात्कारी मंत्र्यांना आणि नेत्यांना वाचवण्याची चढाओढ सुरु आहे. सगळं माहिती असूनही मुख्यमंत्री काहीच करु शकत नाहीत? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड सध्या राजकारणात आला आहे. मात्र संजय राठोड हा पूजा चव्हाणचा हत्यारा आहे, त्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात, असा हल्लाबोल चित्र वाघ यांनी मंगळवारी केला होता.