पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसात आपल्यासमोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास दहा 11 ऑडिओ क्लिप, फोटोज समोर आलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पोलिसांनी वाट न बघता थेट संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत
आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करावी. एवढे पुरावे असताना तुम्ही आता वाट कुणाची बघत आहात? अशा लोकांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात”, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत बोलताना दिली.
संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.
आता मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे, कसली वाट बघताय? एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय? ताबडतोब कारवाई करा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.