गत काही दिवसांपासून पुजा चव्हान या तरुणीच्या संशयीत मृत्युवरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. पुजा चव्हान प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे नाव समोर येत असल्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुजा चव्हान प्रकरण दिवसेंदिवस नविन वळण घेत अाहे. यातच वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. संजय राठोड यांनी अद्याप माध्यमांसमोर येऊन याप्रकरणिक कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू अखेर संजय राठोड यावर मौन सोडणार असल्याची माहिती मिळते आहे.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या गावी संजय राठोड दि. १८ फेबृवारील माध्यमांसमोर येणार आहे. पोहरादेवी हे गाव बंजारा समाजासाठी महत्वाचे ठिकाण मानले जातात. बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांचे मंदिर याठिकाणी आहे. बंजारा समाजातील संत आणि महंत याठिकाणी मंदिरात वास्तव्यास असतात. याठिकाणी महंतांचा आशिर्वाद घेऊनच ते माध्यमांसमोर बोलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. राठोड यांचा त्यांच्या दिग्रस मतदारसंघाशिवाय आजूबाजूच्या मतदारसंघातील बंजारा समाजावर प्रभाव आहे. पोहरादेवी याठिकाणास बंजारा समाजात विशेष महत्व आहे. संजय राठोड आपल्या अनेक चांगल्या कामांची सुरुवात पोहरादेवी येथील महंतांचा आशिर्वाद घेऊनच करत असतात. पुजा चव्हान संशयीत मृत्यु प्रकरणावरुन समाजात अस्वस्थता होती. त्यामुळेच संजय राठोड यांनी हे ठिकाण निवडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुजा चव्हान हीच्या आत्महत्येनंतर काही अॉडिअो क्लीप्स समोर आल्या होत्या. यावरुन संजय राठोड यांचे नाव समोर येत होते. परिणामी भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणि सातत्याने लावून धरली होती. अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. राजीनामा स्विकारण्यावरुन मातोश्रीवर बैठक घेण्यात आली होती. यावेळी राजीनामा स्विकारावा व स्विकारु नये असे मतप्रवाह झाले होते अशी माहितीसुद्धा सुत्रांनी दिली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर भाष्य करत निष्पक्ष चौकशी होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पुजा चव्हान हीचा मोबाईल, लॅपटॉप या सगळ्ता वस्तूंना ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच पुणे ग्रामीन पोलिसांची पाच सदस्यीय समिती यवतमाळात दाखल झाली आहे. चौकशीअंती योग्य कारवाई करु असे अनिल देशमुख म्हणाले आहे. दरम्यान संजय राठोड काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.