संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राज्यपालांनी अखेर केली सही

23

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यात विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यवादात असलेल्या दबावामुळे मंत्री संजय राठोड यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

अनेक दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने विरोधकांकडून आघाडी सरकारला घेरण्यात येत होते. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा कोचक सवाल भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला होता.

मात्र आता या राजीनाम्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केल्याची माहिती खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे आता अधिकृतपणे संजय राठोड यांची मंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे. आता या जागेवर तीन पक्षाच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार की पुन्हा विदर्भावर अन्याय होणार हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.