आज आपल्या देशात पंतप्रधानांनी लस घेतली हे कौतुकास्पद आहे: संजय राऊतांचा टोला

5

नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली.यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं आणि त्यांना टोलाही लगावला.

सगळ्या देशातील राज्यातील नेते आपल्या जवळपास असतील याची काळजी घेतली जात होती. निवडणूक हा तुमच्या डोक्यातील किडा आहे. तो त्यांच्या डोक्यात कदाचित नसेलही. ते फार सरळमार्गी आहेत,” असंही ते म्हणाले.

अमेरिकेतही जेव्हा जो बायडेन यांनी लस घेतली, तेव्हा तेथील जनतेलाही ही लस आपलं रक्षण करेल असा विश्वास वाटला. आज आपल्या देशात पंतप्रधानांनी लस घेतली हे कौतुकास्पद आहे,” असं राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं आहे.