“मग डोकी फुटलीत तर रडत जाऊ नका” बेळगाव प्रश्नावरुन संजय राऊतांची संतापजनक प्रतिक्रिया

7

कर्नाटक-महाराष्ट्र सिमावाद पुन्हा ऊफाळून आला आहे. बेळगावमध्ये कानडी लोकांकडून मराठी लोकांवर हल्ले करण्यात येत आहे. अशांतच शिवसेनेच्या कार्यालयावर आणि काही कार्यकर्त्यांवर कानडी वेदीका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. यावरुन शिवसेनेचे खा. संजय राऊत हे चांगलेच संतापले आहेत. बेळगावात मराठी लोकांवर होणार्‍या अत्याचाराची दखल कुणी घेणार नसेल तर आम्हाला बेळगावात ऊतरावे लागेल. त्यानंतर तुमची डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका असेसुद्धा संजय राऊत यावेळी म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

बेळगावात मराठी लोकांवर वारंवार हल्ले होत आहेत. तेथील कायदा आणि सुव्यवस्था ऊद्वस्थ झाली आहे. पं.बंगालमध्ये असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना या हल्ल्यांवर काहीच बोलावेसे वाटत नाही का? असा संतप्त सवाल त्यानी केला आहे.

बेळगावातील मराठी माणसांवरील वाढते हल्ल्यांची कुणी दखल घेतली नाही तर सर्व ताकदीनिशी आम्ही बेळगावात ऊतरु आणि त्यानंतर ऊद्भवलेल्या समस्यांना शिवसेना जवाबदार असणार नाही. बेळगावातील मराठी बांधव हे आपले आहेत. त्यांच्यावरील हल्ले सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने याबाबत गंभीर विचार करावा अन्यथा कोल्हापुर, सांगलीतील मराठी लोकं बेळगावात घुसतील असा ईशारासुद्धा त्य‍ांनी यावेळी दिला.