संजय राऊतांचा भाजपला टोला म्हणाले…

13

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपला टोले लगावले.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. 

वर्षे जात असतात. पण नेहरु ते राजीव गांधी आणि मनमोहन सिंगांपर्यंतचा लेखाजोखा पाहिला तर नेहरुंच्याच पुण्याईवर हा देश उभा असल्याचं दिसून येतं.असा टोला त्यांनी लगावला आहे.

नेहरु ते मनमोहन सिंगांपर्यंतच्या सरकारांनी अनेक योजना आणल्या. अनेक प्रकल्प उभे केले आहे. त्यामुळे देशाची जडणघडण झाली. मागच्या या पुण्याईवर देश चालला आहे, असं राऊत म्हणाले.

मोदींकडे नेतृत्व क्षमता आहे. ते देशाला योग्य दिशा देतील, जनतेला योग्य मार्ग दाखवतील याची आजही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मोदींना अजून बरंच काही करणं बाकी आहे, असंही ते म्हणाले.