पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरूनगर येथील पंचायत समितीतील राजकारण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फोडाफोडीच्या राजकारणावरून चांगलीच जुंपली आहे.
खेडमध्ये असा प्रकार होणे योग्य नाही. हे प्रकरण पहिल्यांदा जयंत पाटलांना सांगितले होते. पण त्यांनी काहीच केले नाही.आता अजित पवारांनी तरी या प्रकरणात लक्ष घालावे अशी आमची अपेक्षा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत थेट अजित पवारांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी पुन्हा एकदा पुण्यात खेड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.