एकीकडे कोरोनासारख्या आजाराने रुग्णांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधक हे ब्लॅक फंगसअसल्याची जाहीर टीका केली आहे.
त्यावर महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला असल्याचा पलटवार भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे .
तसेच कोरोना महामारीत मुंबईत चांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलं आहे . मात्र, विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.