महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावले आहेत.
दरम्यान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोन दिवसांपासून त्यांंना कोरोनाची लक्षणं आढळत असल्याने चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याच समोर आले आहे.
उपचारासाठी त्यांना मुंबईतल्या फोर्टीस रुग्णालयात दाखल केलं आहे त्यामुळे संजय राऊत यांनाही कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.
संजय राऊत यांनी नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली होती. त्यामुळे आता संजय राऊत यांनाही कोरोनाची लागण झाली असेल तर शरद पवार यांचे काय, अशी चिंता निर्माण होत आहे.