संज्या कधीतरी डोकं लाऊन बोलत जा; भाजप नेते निलेश राणे कडाडले…

17

तीन कृषी विधेयक रद्द करावे यासाठी गेले अनेक महिने शेतकरी दिल्ली बॉर्डर येथे आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या अजूनही केंद्र सरकारने पूर्ण केलेल्या नाहीय. दिवसेंदिवस शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हिंसाचार प्रकरणात शेतकरी आंदोलनात सामील असलेला आरोपी दीप सिद्धू याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप खासदार सनी देओल यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केले होते. त्याला आता भाजप नेते निलेश राऊत यांनी ट्विट करत जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘उद्या कुणी येऊन संज्या राऊत सोबत फोटो काढेल आणि सिंघू बॉर्डरवर जाऊन भाषण करेल, तर संज्याला अटक करायची का? आमचेही उद्धव ठाकरे सोबत फोटो आहेत उद्या आम्ही भडकाऊ भाषण केलं तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असणार आहेत का? संज्या कधीतरी डोकं लावून बोलत जा.’ असे ट्वीट करत निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.