सर्वोदय ग्रामविकास फाऊंडेशनतर्फे मरखेल ग्रामपंचायतिच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे जाहीर सत्कार

दिनांक १४ मार्च, मरखेल जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी तीन वर्षांपूर्वी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन सर्वोदय ग्रामविकास फाउंडेशनची निर्मिती केली व स्थापने पासून अविरतपणे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत जसे की डिजीटल शाळा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, ग्रामस्वच्छता अभियान, गुणवंतांचे सत्कार, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन इत्यादी.

नुकतीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नंतर नियुक्त झालेल्या सरपंच, उपसरपंच सर्व सभासदांकडून गावाच्या सर्वांगीण विकासात भर पडावी, कारण ‘गाव करील ते राव काय करील?’ या लोकोक्ति प्रमाणे गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत पदाधिकारीच अत्यंत महत्वाचे असतात म्हणूनच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा आज जाहीर सत्कार करून गावातील काही अती महत्वाच्या विकासकामांसाठी सर्वोदय फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी सर्व पदाधिकारी सभासद व गावकऱ्यांच्या वतीने विनंती वजा निवेदन दिला व ग्रामपंचायतीतील सर्व चांगल्या कामांसाठी वेळोवेळी सर्वोदय फाउंडेशन सहकार्य करेल अशी ग्वाही दिली आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गावाचा विकास हा जनतेच्या व सर्वोदय फाउंडेशन मधील सुजाण लोकांच्या मदतीने सोपे होईल, गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच, महिलांना सन्मान व उद्योगाची संधी निर्माण करू आणि गावातील सर्व प्रकारचे अवैध अतिक्रमण हटवून त्याठिकाणी विकासकामे केले जातील असे माजी पंचायत समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र गवाले यांनी सरपंच प्रतिनिधी म्हणून त्यांचे मत व्यक्त केले व जनतेला घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरण्यासाठी आवाहन केले आणि यातून जमा होणारे सर्व पैसे विकासकामासाठीच वापरले जातील व आगामी काळातील सर्व कामे पारदर्शकपणे करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात नागीनबाई मच्छिंद्र गवाले सरपंच, संदिप किशनराव पाटील उपसरपंचपद, व सर्व सदस्य पंडित गवाले, अपर्णा आंबूरे, निर्मलाबाई मठपती, मालनबाई राठोड, शिवप्रसाद बोडपवार, संजयरेड्डी चेपुरे, बलभीम रावसाहेब, सुधाकर नारलावार, तेजाबाई राजुरे आणि राहुबाई दुंपलवाड यांचे सर्वोदय ग्रामविकास फाउंडेशन तर्फे जाहीर सत्कार करण्यात आले. सर्वोदय फाउंडेशन चे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, कार्याध्यक्ष मनोहर मालीपाटील, उपाध्यक्ष डॉ शंकर धमनसुरे, सचिव विठ्ठल पांगरे, सर्व पदाधिकारी, सदस्य व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमात उपस्थित होते. कार्याक्रमचे सूत्रसंचलन नितीन पांगारे यांनी तर प्रास्ताविक प्रदीप कुलकर्णी यांनी केलं आणि उपस्थितांचे आभार प्रा. अली माळेगावकर यांनी मानले.