दिवंगत खा. राजीव सातव यांच्या पार्थिवावर साश्रुनयनांनी पुष्पवृष्टी करत श्रध्दांजली

19

जिंतूर तालुक्यातील चाराठाना येथे दिवंगत खासदार राजीव सातव यांचा पार्थिवदेह घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर चारठाणा व जिंतूर शहरात रविवारी रात्री हजारो नागरिकांनी पुष्पवृष्टी करत भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.

जालना येथून वाटुरफाटा मार्गे दिवंगत खा.सातव यांचा पार्थिवदेह घेऊन जाणारा ताफा चारठाणा फाट्यावर दाखल झाला; त्यावेळी शेकडो ग्रामस्थांनी त्या रुग्णवाहिकेवर जोरदार पुष्पवृष्टी करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. चारठाणा टि पाॅईट वर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबिसी सेलचे सरचिटणीस नानासाहेब राऊत, उपसरपंच वाजेद कुरेशी, माजी सरपंच तहसिन देशमुख,

अन्नासाहेब राउत, ग्रामपंचायत सदस्य रहेमत अली, राममामा चव्हाण, शिवशंकर तमशेट्टे, सचिन घाटुळ,दौलत देशमुख, सलीम इनामदार, नाना निकाळजे, दाउद अली, बाळासाहेब घाटुळ, पत्रकार रंगनाथ गडदे, शारेख देशमुख, प्रभाकर कुर्हे यांच्या सह असंख्य नागरिक उपस्थित होते..

जिंतूर शहरातील चौकात हजारो नागरिकांनी दुतर्फा उभे होते. त्यांनीही रग्णवाहिकेवर पुष्पवृष्टी केली. राजू सातव अमर रहे !!!! अशा घोषणा यावेळी दिल्या. जिंतूर मार्गे तो ताफा हिंगोली कडे रवाना झाला.