काही दिवसांपूर्वीच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. पण स्वत: कोरोना पॉझिटीव्ह असूनही त्याची मदत थांबली नव्हती. आता सोनू कोरोनामुक्त झाला आहे आणि पुन्हा एकदा लोकांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे.
सोनू इतक्या लोकांची मदत कशी करू शकतो? त्याला कुठून इतकी प्रेरणा मिळते? कुठून तो इतकी ऊर्जा आणतो? असे प्रश्न कदाचित तुम्हालाही पडले असतील. तर आता सोनू सूदने खुद्द याचे उत्तर दिले आहे.
काही गरजू रूग्णांना बेड मिळवून देऊन, काहींना ऑक्सिजनची मदत करून लोकांचे जीव वाचत असतील तर यापेक्षा मोठे समाधान नाही. शपथेवर सांगतो, 100 करोडी सिनेमाचा भाग बनण्यापेक्षा यातून मिळणारे समाधान लाखपटींनी मोठे आहे. असे सोनू सूद ने ट्विट करून सांगितले आहे.