औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिरीष बोराळकर यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विजय खेचून आणला आहे.
सतीश चव्हाण यांना तब्बल 166638 इतकी मते मिळाली आहेत. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58743 इतकी मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण जवळपास 57895 मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत.
यंदा महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी सोबत शिवसेना आणि काँग्रेस लढत असल्याने राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांना मोठा फायदा झाल्याचे दिसते. भाजपाच्या शिरीष बोराळकर यांचा हा मोठा पराभव भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे.