सौरव गांगुलीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, रुग्णालयातुन मिळाला डिस्चार्ज

7

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. त्यांना अपोलो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुली यांना बुधवारी २७ जानेवारीपुन्हा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर गांगुलीला डॉक्टरांनी किमान 7 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. गांगुलीची प्रकृती आता ठणठणीत आहे, अशी माहती डॉक्टर राणा दासगुप्ता यांनी दिली. 

या महिन्याच्या सुरुवातीला 2 जानेवारीला सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. कोलकातातील वुडलँडस् रुग्णालयात त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर ते क्रिटिकल केअर युनिटमध्ये दाखल होते. मात्र, पुन्हा त्रास जाणवत असल्याने ते रुग्णालयात दाखल झाले होते.