शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर सयाजी शिंदेंचा शिवसंकल्प!

12

जाणून घ्या काय विशेष आहे

प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकताच एक संकल्प केला आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर हा संकल्प केला असल्यामुळे त्यांनी यास शिवसंकल्प असे नाव दिले आहे. येत्या १९ फेबृवारीला म्हणजेच शिवजयंतीला ते हा संकप्ल पुर्णत्वास नेणार आहेत.

काय आहे शिवसंकल्प?
सयाजी शिंदे हे अभिनेत्यासोबतच एक पर्यावरणप्रेमीसुद्धा आहेत. सह्याद्री-गेवराईच्या माध्यमाने ते राज्यभरातील ऊजाड डोंगरांना हिरवेगार करण्याचे काम करत आहे. या पार्श्वभूमिवरच त्यांनी शिवसंकल्पाची घोषणा केली आहे. महराष्ट्रातल्या प्रत्येक गडावर शिवजयंतीच्या दिवशी ४०० वृक्षे लावण्याच हा संकल्प आहे. स्वत: सयाजी शिंदे पन्हाळगडावर जाऊन वृक्षारोपन करणार आहे. सर्व शिवभक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे याकरिता त्यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीअो शेअर केला आहे. ज्यामध्ये शिवसंकल्पाचे स्पष्टीकरण देत या ऊपक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहनसुद्धा केले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10158044396875784&id=596610783&sfnsn=wiwspwa&d=w&vh=i

काय म्हणाले सयाजी शिंदे?
सयाजी शिंदे यांनी नुकताच यासंदर्भात एक व्हिडीअो शेअर केला आहे. हा व्हिडिअो चांगलाच व्हायरल होतो आहे. “रयतेच्या पिकालासुद्धा हात लागता कामा नये असे महराज म्हणायचे. स्वराज्यामध्ये वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण होते. सह्याद्रीच्या या दर्‍याखोर्‍यातील झाडांच्या सहाय्यानेच आपले मावळे शत्रुंना गनिमी काव्यानी पार झोपटून सोडायचे. शत्रूंनी सह्याद्रिची ईतकी धास्ती खाल्ली होती की कुणीही महाराजांवर सह्याद्रिच्या पर्वतरांगात शिरुन हल्ला करण्याचा विचारसुद्धा करत नसे, मात्र याच सह्याद्रिला आपण पार बोरका करुन टाकलाय. झाडं म्हणजे रयतेची लेकरं अस तळमळीने सांगणार्‍या महाराजांचसुद्धा तुम्ही ऐकणार आहात की नाही.” असे भावूक आवाहन त्यांनी या व्हिडिअोतून केले. सोबतच “चला संकल्प करुया …. प्रत्येक गडावर ४०० झाडे लावण्याचा कारण झाडाशिवाय गडाला सुंदरता नाही. या शिवजयंतील गडावर मशाल नेऊच पण सोबत हिरवी मशालसुद्धा घेऊन जाऊया” असेसुद्धा सयाजी शिंदे यावेळी म्हणाले.

सयाजी शिंदे हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटांबरोबर अनेक तामीळ चित्रपटातसुद्धा भूमिका साकारल्या आहेत. पर्यावरणाबद्दल त्यांना विशेष आपुलकी आहे. गेल्या वर्षी सह्याद्रि-देवराईच्या माध्यमातून त्यांनी बीड येथे भव्य वृक्षसम्मेलनाचे आयोजन केले होते. या वृक्षसम्मेलनास पर्यावरणवादी आणि सामान्य लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.