२१ व्या शतकात आपण जगतोय. मात्र अजूनही अंधश्रद्धा कमी झालेली नाही. धनाच्या लोभापायी अनेक जण आजही अंधश्रद्धेला बळी पडत असतात. वर्धा जिल्ह्यात पैशाचा पाऊस पडतो. असा दावा करून गुप्तधनासाठी युवतीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे.
पीडितेची आई ८० कोटी रुपयांना बळी पडली आणि लेकीसोबत मांत्रिकाने घृणास्पद प्रकार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेहमीच होणाऱ्या या छळाला कंटाळून पीडिता घरातून निघून गेली. पिडितेची मीसिंग तक्रार दिल्यानंतर, तपासाअंती पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.
मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेला हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत बाळू मंगरुटकर आणि पीडितेचा काका अशा दोघांना अटक केली आहे.
80 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचा दावा मांत्रिकाकडून केला गेला होता. त्यासाठी युवतीला निर्वस्त्र करत घृणास्पद प्रकार करण्यात आले. पीडितेला वारंवार निर्वस्त्र करून तिच्यासोबत अनेक घृणास्पद प्रकार घडल्याचे तिने पोलिसांना सांगितले.