SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट! सर्च करुन बँकेच्या साईटवर जाताय?, वेळीच व्हा सावध

8

बँकेचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने अगदी कमी वेळात सहज आणि वेगाने होतात. त्यामुळेच ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याकडे हल्ली अनेकांचा अधिक कल असतो. इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे बँकिंग खूपच सोपे केले आहे. मात्र सध्या ऑनलाईन फ्रॉड वाढले आहेत. अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India)  मोलाचा सल्ला दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावध करत असते. यावेळी ही बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ग्राहकांना अलर्ट केलं आहे. 

युजर्स अनेकदा बँकेचे व्यवहार करताना गुगल सर्चचा आधार घेतात. आणि समोर जे दिसेल त्यावर क्लिक करतात. बँकेच्या साईटवर जाण्यासाठी गुगल सर्च किंवा इतर ब्राउजरचा वापर करून साइट व्हिझीट केली जाते. मात्र आता एसबीआयने सर्व सर्च रिझल्ट बरोबर असतीलच असं नाही. या समस्येपासून वाचण्यासाठी बँकेने काही हेल्पलाइन क्रमांक आणि वेबसाईट जारी केली आहे. गुगल सर्चवर अनेक ग्राहक फेक साईट्सवर जातात. एसबीआयने बँकेविषयी अपडेट मिळवण्यासाठी https://bank.sbi या वेबसाईटवरच जा. तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती मिळेल असं म्हटलं आहे.