सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून पासून करण्यात आली होती. मात्र वर्षभर करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामूळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंदच ठेवण्यात आली होती. पहिली ते अकरावीच्या परीक्षा ही रद्द करण्यात आलेल्या आहेत.
शाळांना 1 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सन 2021-22 चे शैक्षणिक वर्ष 14 जूनपासून सुरू करावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
माध्यमिक शाळा संहिता नियमा नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे .