अंबानी आणि रिलायन्स कंपनीवर सेबीची मोठी कारवाई, भरावा लागला एवढा मोठा दंड

28

भांडवली बाजार नियामक अर्थात सेबीने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहाला दंड भरण्याचा आदेश दिला. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह(आरआयएल) अन्य दोन कंपन्यांना एकूण 70 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने नोव्हेंबर 2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडमध्ये आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली.

शेअर घोटाळा केल्याप्रकरणी सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी रुपयांचा तर मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड केला. तसेच नवी मुंबई सेझ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २० कोटी रुपये आणि मुंबई सेझ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १० कोटी रुपयांचा दंड केला. नोव्हेंबर 2007 मधील शेअर्सच्या खरेदी-विक्री प्रकरणात मुकेश अंबानी व रिलायन्स इंडस्ट्रीजला दंड ठोठावला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आरपीएलचे 4.1 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता.

याप्रकरणी सेबीचे अधिकारी बी. जे. दिलीप यांनी 95 पानांच्या आदेशपत्रात कोणाला किती दंड आणि त्याची कारणे या संदर्भात सविस्तर माहिती नमूद केली आहे. यामध्ये सिक्युरिटीजच्या प्रमाणात किंवा किंमतीत कोणताही फेरबदल केल्याने बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होतो आणि बाजाराच्या घडामोडीत त्याचा सर्वाधिक फटका बसतो. याबाबत रिलायन्सची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये असे लिहले आहे.