ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघाडी धाडण्यात यश आलं. खरंतर दोघांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनी मिळून 70 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर रोहित शर्मा 26 धावांवर असताना हेजलवूडने त्याला बाद केलं.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर भारताच्या धावसंख्येचा वेग मंदावला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांना 11 धावांचीच भर टाकता आली.ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच 300 धावांचा टप्पा पार केला. स्टीव स्मिथचा फॉर्म परत येणं ही ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक गोष्ट आहे
भारतासाठी रवींद्र जडेजाने चार, जसप्रीत बुमरा आणि नवदीप सैनीने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.सिडनी कसोटीचा दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी चांगला ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 96 धावा केल्या आहे. पहिल्या डावात भारतीय संघ ऑस्ट्रेलियापासून अजूनही 242 धावांनी पिछाडीवर आहे.