पहा कशी झाली ‘त्या’ स्कॉर्पिओ कारची चोरी

18

रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली. त्यात जिलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली.

आताच समोर आलेल्या माहितीनुसार, हिरेन मनसुखानी हे या कारचे मालक आहे. ते ठाणे येथे राहतात.हिरेन मनसुखानी हे १७ फेब्रुवारीला मुंबईला यायला निघाले होते. ऐरोलीहून विक्रोळी मार्गे येताना, रस्त्यात गाडीचे स्टेअरिंग जाम झाल्याने त्यांनी गाडी विक्रोळी परिसरात सोडली.

दुसऱ्या दिवशी गाडी घ्यायला गेले असता. गाडी नव्हती त्यामुळे गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.काल रात्री टिव्हीवर गाडी पाहिल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी स्वत: पोलिसांना माहिती दिली. दरम्यान हिरेन यांना चौकशीसाठी मुंबई पोलिस आयुक्तालयात आणलं आहे.

रात्री दहशतवादी विरोधी पथकही घटनास्थळी आले होते आणि सीसीटीव्ही ज्या दुकानातून मिळाला तिथून हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीमही अंबानींच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात आली आहे.