पहा सचिन तेंडुलकरने पृथ्वी शॉच्या बॅटिंग टेक्निकमधील कोणत्या चुका सांगितल्या सविस्तरपणे

9

ऍडलेडमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये पृथ्वी शॉ बोल्ड झाला. या मॅचमध्ये त्याला एकूण 4 रनच करता आले. आयपीएल 2020 पासूनच पृथ्वी शॉ मैदानात संघर्ष करत आहे, त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.त्यावर पृथ्वीचा आयडॉल असलेला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने पृथ्वीच्या बॅटिंग टेक्निकमधील काही चुका सविस्तरपणे सांगितल्या आहेत.

पृथ्वीच्या बॅकलिफ्टबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, “अशा चुका जेव्हा होतात तेव्हा फलंदाजाच्या मनात एकाच वेळी अनेक विचार सुरु असतात किंवा बॅट्समन शॉर्ट पीच बॉलची अपेक्षा ठेवत असतो किंवा त्याची वाट पाहत असतो”.पृथ्वीची बॅट बॉलच्या दिशेने मायक्रो सेकंद जरी लेट आली तरी बॅट आणि पॅडच्यामध्ये विशिष्ट अंतर पडतं आणि साहजिकच बॉल त्याच गॅपमधून स्टम्पकडे जातो, अशी खास टिप्स सचिनने पृथ्वीला दिलीय.

फलंदाजासोबत त्यावेळी असं घडतं ज्यावेळी त्याच्या मनात एकापेक्षा अधिक विचार सुरु असतात किंवा तो शॉर्ट पीच बॉलची अपेक्षा करत अशतो, असं सचिन म्हणाला.माझ्या म्हणण्यानुसार पृथ्वीने बॉलचा अंदाज घेऊन त्या दृष्टीने खेळण्याची तयारी करावी, असं सचिन म्हणाला.