पहा सचिन तेंडुलकरच्या प्रकृती बाबत त्याच्या बालमित्राने काय दिली आहे महत्त्वाची बातमी

11

तेंडुलकरच्या बालपणाच्या मित्रानं त्याच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानं शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याची माहिती दिली आणि क्रिकेट चाहत्यांच्या मनात धाकधुक वाढली. 

चाहत्यांनी चिंता करण्याची कारण नाही. हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळतील म्हणून तो तेथे दाखल झाला आहे. त्यात कोरोनाची लक्षणे दिसत होती आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे होते. तेथे मशीन्स व अन्य सर्व साहित्य उपलब्ध आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून तो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाला आहे.असे त्याचा बालमित्र अतुल रानडे याने सांगितले आहे.

त्याची प्रकृती सुधरावी यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी प्रार्थना करत आहेत. पाकिस्तानचा माजी दिग्गज वसीम अक्रम, शाहिद आफ्रिदी यांनीही तेंडुलकरला लवकर बरा हो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.