पहा :शिक्षण समितीच्या बैठकीत नेमका कोणता मुद्दा गाजला

10

सभापती भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर मध्ये शिक्षण समितीची बैठक पार पडली.शिक्षण समितीच्या बैठकीत ध्वजनिधी गैरव्यवहाराचा मुद्दा गाजला. सदस्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. सभापती भारती पाटील यांनी कोणताही निर्णय दिला नाही.तसेच विभाग हा गैरव्यवहार दडविण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा रंगली होती.

भारती पाटील यांनी सभा सुरू होण्यापूर्वी संविधानाच्या उद्देशिकेबद्दल विचार व्यक्त केले. शिक्षण समितीच्या सभेत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याबाबत समितीपुढे मत मांडले. दर महिन्याच्या शिक्षण समितीच्या सभेत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याबाबत ठराव पारित करण्यात आला.

गेल्या काही वर्षांत गोळा करण्यात आलेल्या निधीचा ताळमेळच जुळत नसून, दोन अधिकाऱ्यांनी संबंधित टेबलचा प्रभार स्वीकारण्यास नकार दिला होता. यात अपहार झाल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यास साधी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली नाही. हे प्रकरण दडविण्याचा प्रयत्न होता. समितीच्या बैठकीत सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केलात्यावर सभापती व शिक्षणाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. 

या बैठकीला शांता कुमरे, दुधराम सव्वालाखे, प्रकाश खापरे, देवका बोडखे, राजेंद्र हरडे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.