माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली आहे. या सरकारच्या निर्णयावर नारायण राणे संतापले आहेत.तसेच फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी भाजप पक्षातील नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
माझी सुरक्षा काढल्याने मला काही तक्रार नाही. पण माझ्या जिविताचं काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.विरोधकांचा आरोपातील हवा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून माझी सुरक्षा कमी करा, अशी सूचना केली आहे. फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.