पहा काय आहे परिक्षासंदर्भात शिक्षण मंत्र्यांची महत्वपुर्ण माहिती

10

राज्यात मागील दोन दिवसांमध्ये वाशिम आणि सोलापूर येथे निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली. 

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पुढील काळात इयत्ता पहिली ते नववीपर्यंत परीक्षा घेण्यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या ठिकाणी स्थानिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हाधिकारी यांनी शिक्षण संस्थाचालक यांच्याशी समन्वय साधून शाळा चालू ठेवायच्या की बंद करायचा या संदर्भात निर्णय घ्यावा.अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत मात्र बोर्डाकडून अहवाल मागवण्यात येईल. राज्यात रुग्णांची वाढत राहिली तर याबाबत देखील निर्णय घेण्यात येईल, असं शिक्षणमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘न्यूज18 लोकमत’ला मुलाखत देताना सांगितले आहे.