बघा काय आहे ,देशातील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारचं मोठे गिफ्ट

20

देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडियाचे तिकिट निम्म्या दरात मिळणार आहे. विमानोड्डाण मंत्रालयाने बुधवारी याची माहिती दिली आहे.एअर इंडियाच्या वेबसाईटवरही याची माहिती दिलेली आहे. मात्र, यासाठी काही अटी असणार आहेत

प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे भारतीय नागरिकत्व हवे. भारतात स्थायिक असलेल्या नागरिकांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवे. इकॉनॉमी केबिनमध्ये बुकिंग श्रेणीच्या मूळ भाड्याचे ५० टक्के.भारतात कोणत्याही सेक्टरच्या प्रवासासाठी लागू.तिकिट जारी केल्याच्या १ वर्ष मुदतीसाठी लागू.प्रवासाच्या सात दिवस आधी बुकिंग करावे लागेल.इत्यादी अटी आहेत .

एअर इंडियाला सरकार खासगी कंपन्यांना देण्याच्या प्रयत्नात आहे. टाटा ग्रुप पुन्हा एकदा एअर इंडिया चालवू शकतो, अशा बातम्या आल्या होत्या. टाटा ग्रुपनेच यासाठी अर्ज केला आहे. एअर एशियात टाटा ग्रुपचा मोठा हिस्सा आहे.एअर इंडियाकडून ही स्कीम या आधीही देण्यात येत होती. मात्र, आता याला मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.