पहा काय आहे विजबिल माफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान

15

पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वीजबिल वसुलीवर प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीड पंपासाठी सवलत सरकार देत असल्याचं त्यांनी सांगितलं .ते आज श्रींगोदा येथे आले होते. 

जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही. मात्र आम्ही पन्नास टक्के शेतकऱ्यांना वीज पंपांकरता शेतकऱ्यांना सवलत दिली आहे.त्यामध्ये हजारो कोटी रुपये महावितरण कंपनी सहन करणार आहे. शेवटी हे चालवण्याकरता निधी लागतो. तरी देखील काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकरता माफ केले आहेत”, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंधा येथे पत्रकारांसोबत बोलताना केलं आहे.

शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रीतील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आमची बैठक झाली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील काल आम्ही भेटलो. आम्ही सर्वांना निर्वाणीचा इशारा दिला आहे”, असं राजू शेट्टी म्हणाले“लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत.

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याऐवजी जर सक्तीने वीज कनेक्शन तोडणार असाल तर आम्हाला सुद्धा दोन हात करण्याशिवाय पर्याय नाही. वीज कनेक्शन कट करुन दाखवाच जनतेतून काय प्रतिक्रिया उमटतील ते तुम्हाला कळेलच”, असं राजू शेट्टी म्हणाले.