कोरोना लसीसंदर्भात बघा काय आहे गुड न्युज

22

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लशीबाबत एक गुड न्यूज दिली आहे. सिरम कंपनीला महाराष्ट्रातील कोल्डचेन, लॉजिस्टिक्स, ट्रेंनिग याबाबत टार्गेट दिले होते, ते पूर्ण झाले असल्याचं सिरम कंपनीने सांगितले असून केंद्राच्या परवानगीकडे डोळे लागले असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

सिरमच्या कोरोना लशी संदर्भातील वैद्यकीय चाचण्या संपल्या असून या लसीला आता परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे.त्यामुळे सिरमने लसीला परवानगी मिळण्यासाठी ड्रग अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडे दाद मागितली आहे. मात्र त्यांच्या प्रोटोकॉलनुसार या मागणीवर कारवाई करेल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला आहे.सिरम कंपनीचे कोरोना लशीसंदर्भातील काम बऱ्यापैकी संपलेले असून ड्रग अ‍ॅथॉरिटीकडून या लशीला परवानगी मिळणे आवश्यक असल्याचं टोपे म्हणाले

प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारने ट्रान्सपोर्ट आणि कोल्डचेनची व्यवस्था करणे गरजेचं असल्याचंही टोपे म्हणाले.ऑक्सफर्ड विद्यापीठाने देखील सिरमच्या 30 ते 35 हजार लोकांवर चाचण्या घेतल्या असून पुण्यातील सिरमने देखील 1 हजार पेक्षा जास्त लोकांवर चाचण्या घेतल्या आहे. कोरोना लशीला अधिकृत परवानगी मिळण्यासाठी सिरम कंपनीने केंद्राकडे परवानगी मागितली, या परवानगीकडे डोळे लागले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.