कालानुरुप बदल म्हणून ट्विरटमध्ये नवनवे अपडेट केले जातात. नुकत्याच केलेल्या बदलानुसार ट्विटरने थेट व्हाईस मेसेज पाठवण्याची सोय करून दिली आहे. ट्विटरच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये ही सुविधा असेल.
या नव्या फिचरमुळे ट्विटर युजर्सना एक नवा अनुभव मिळू शकेल, असे ट्विटरने सांगितले आहे. यापूर्वी ट्विटरने ऑडियो मेसेजिंगचे पिचर लॉन्च केले होते. त्यानंतर आता व्हाईस मेसेजिंगचीही सुविधा ट्विटरने जारी केली आहे.
कसा करावा नव्या फिचरचा उपयोग ?
ट्विटरचे अपडेटेड व्हाईस मेसेजचे व्हर्जन वापरण्यासाठी सर्वप्रथम ट्विटर अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर डायरेक्ट मेसेजिंग ऑप्शनमध्ये जाऊन व्हाईस रेकॉर्डिंग या बटनावर क्लिक करा. त्यानंतर व्हाईस मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर ते समोर पाठवता येईल. विशेष म्हणजे, व्हाईस मेसेज समोर पाठवण्यापूर्वी त्याला पुन्हा एकण्याचा ऑप्शन ट्विटरने दिलेला आहे. त्यामुळे योग्य मेसेज रेकॉर्ड झाला का?, हे चेक करता येणार आहे. व्हाईस मेसेजची सुविधा मोबाइल अॅप अशा दोन्हींवर उपलब्ध आहे.
ट्विटरने ही सुविधा भारत ,ब्राजील आणि जपान या देशांसाठी जारी केली आहे. कोणतेही ट्विट करताना जशी शब्दांची मर्यादा असते, तशीच 140 सेकंदांची मर्याद आता व्हाईस मेसेजमध्ये असणार आहे.