पहा काय आहे ? मुंबईकरांना महापालिकेचा इशारा

6

मुंबईबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वाढलेली संख्या आणि प्रतिबंधात्मक नियम धुडकावून शहरात ठिकठिकाणी होणारी गर्दी यामुळे मुंबईतील कोरोना  रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्याचा सूचक इशाराही दिला आहे. 

महापालिका मुंबईतील करोना स्थितीचा आढावा घेणार आहे. करोना रुग्ण वाढत राहिले आणि लोकांनी करोनासंबंधीत नियमांचं उल्लंघन केलं तर महापालिका पुढील १० दिवसांत कठोर निर्णय घेताना अजिबात मागे पुढे पाहणार नाही,” असा इशारा सुरेश काकाणी यांनी दिला आहे.

फेब्रुवारीपासून कोरोनाबधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या पुन्हा पाचशेपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवडय़ापेक्षा या आठवडय़ात निश्चितच रुग्णांची संख्या चारशे ते पाचशेने वाढली आहे.

अधिक रुग्णांचे निदान हे विमानतळ, रेल्वे स्थानके आणि पालिकेच्या रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागांमध्ये केलं जातं. त्यात प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही योग्य रीतीने केलं जात नसल्याचं,” सुरेश काकाणी यांनी याआधी सांगितलं होतं.