पहा ,का?? कडाडले अतुल भातखळकर जयंत पाटलांवर

8

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी नुकतेच सांगली येथे महिलेच्या मतदारसंघात जाऊन निवडणुक लढवणे हा काय पुरुषार्थ आहे का, असे विधान केले होते. त्यावरून भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी जयंत पाटीलांवर सणसणीत टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मनातील बुरसटलेली पुरुषी वर्चस्ववादी, सुलतानशाही वृत्ती दाखवून दिली आहे, अशी घणाघाती टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मध्ययुगीन भारतात दिल्लीत राज्य केलेल्या अनेक सुलतानांनी आपले जनानखाने, भोगवादी वृत्ती, याद्वारे आपली पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता दाखवून दिली होती. जयंत पाटील यांचे वक्तव्य आणि मनोवृत्ती अशीच पुरुषसत्ताक सुलतानी प्रवृत्तीची आहे, अशी जळजळीत टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

केवळ डोक्यावरील पगड्यांची अदलाबदल करून स्त्री पुरुष समानतेचे विचार डोक्यात शिरत नाहीत हे ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ध्यानात ठेवावे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामतीतून उद्या पार्थ पवार वा रोहित पवार निवडणुक लढले तरीही जयंत पाटील हेच विधान करणार आहेत का ? राज्यात महिला धोरण आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हे विधान मान्य आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे.