महिलांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणात शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला कोरोनाची लागण झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
आसाराम बापूला जयपूरमधील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आसाराम बापूवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. बापूची प्रकृती सध्या नाजूक आहे.
आसाराम बापूची प्रकृती खालावत असल्याची माहिती आहे. ऑक्सिजन पातळी खालावल्याने आसाराम बापूला त्रास होत होता. त्यामुळे आता आसाराम बापूला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बापूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. यापूर्वीही आसाराम बापूला छातीत दुखण्याच्या कारणावरून रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसाच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. आणि बापूची रवानगी जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.