ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतले उपोषण मागे

234

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांच्याशी चर्चा केली आहे. आज, शनिवारपासून ता.३० होणारे उपोषण काही काळासाठी स्थगित केले आहे. शुक्रवारी ता.२९ सायंकाळी स्वतः अण्णांनी या बाबत पत्रकारांना माहिती दिली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित होते.

यासाठी भाजप नेत्यांकडून आतापर्यंत ७ भेटी घेण्यात आल्या होत्या. या हजारे यांच्या मागण्या मान्य केल्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले. त्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सहा मासात ही समिती हजारे यांच्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेऊन कार्यवाही करील.

अण्णांनी २०१९ मध्ये याच प्रश्नावर राळेगण सिद्धी येथे उपोषण केले होते. त्यावेळी केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाहीच, उलट पाठवलेल्या पात्रालाही समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे अण्णांनी सातत्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अण्णांनी उपोषण करण्याचा निर्धार केला होता. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये म्हणून केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले होते. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगण सिद्धी येथे येऊन चर्चा करून उपोषण न करण्याची विनंती केली.

दरम्यान, लवकरच याबाबत उच्चस्तरीय बैठक दिल्लीत होणार आहे. सरकार अण्णांच्या मागण्यांबाबत गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. नवीन सरकार झाल्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने अण्णांच्या मागण्यांबाबत दखल घ्यायला उशीर झाला. मात्र आता उशीर होणार नाही. अण्णांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सरकार काम करेल.