भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे : मोहन भागवत यांचे वक्तव्य

9

भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे.त्यामुळे अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो.एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी अखंड भारताविषयी मोहन भागवत यांनी आपले विचार व्यक्त केले. 

देशभक्ती मोठ्या प्रमाणात जागृत करणे गरजेचे आहे. फाळणी झालेला भारत पुन्हा एकदा अखंड करणे काळाची गरज आहे. जे भारताला आता स्वतःचा भाग मानत नाही, त्यांना तर अधिक गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

तेव्हा फाळणी झाली असली, तरी आताच्या घडीला अखंड भारत शक्य आहे, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला.

भारत अनेक आव्हानांना सामोरा जाण्यास सक्षम आहे. वसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून जगात आनंद आणि शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते, असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

अखंड भारत हा जबरदस्तीने किंवा बळाचा वापर करून नाही, तर हिंदू धर्माच्या माध्यमातून करणे अधिक संयुक्तिक ठरेल, असे मोहन भागवत यांनी सांगितले.