राष्ट्रवादीच्या ‘ह्या’ नेत्यावर बलात्काराचा गंभीर आरोप; तृप्ती देसाईंची पिडितेसह पत्रकार परिषद

63

परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, लोकसभा निवडणुकीतील उमेदवार राजेश विटेकर यांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समाजसेविका, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे.

राजेश विटेकरांवर तातडीने बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासोबत पिडीत महिला उपस्थित होती.

सदरील महिलेने राजेश विटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, “माझे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. मी तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात” असा खुलासा सदर महिलेने पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा. अशी मागणी तृप्ती देसाईंनी केला. यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवकचे मेहबूब शेख आणि आता राजेश विटेकर या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अत्याचाराचे आरोप नजीकच्या काळात झाले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करायची वेळ आली आहे.