गंभीर, शहीद झालेला तो जवान लग्नाच्या १९ वर्षांनंतर होणार होता बाप!

22

छत्तीसगढमधील सुरक्षा रक्षक जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीने संपूर्ण देशालाच धक्का बसला आहे. एकाचवेळी २२ जवान शहीद झाले, तर ३१ पेक्षा अधिक जवान गंभीर आहेत. दरम्यान एक वेदनादायी बातमी समोर आली अाहे. शहिद झालेल्या जवानांमध्ये असीस्टंट कॉन्स्टेबल किशोर एंड्रीक हे लग्नाच्या १९ वर्षांनंतर बाप होणार होते. मात्र या आनंदाचे रुपांतर आता मोठ्या दु:खात झाले आहेत.

किशोर एंड्रीक शहिद झाल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या पत्नीस जबर धक्का बसला आहे. लग्नाच्या १९ वर्षांनंतर त्यांना बाळ होणार होते. मात्र आता बाळाचा चेहरा बघण्याअगोदरच किशोर यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. यामुळे एंड्रीक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

३ एप्रील रोजी झालेल्या चकमकीत जवानांच्या दुसर्‍या गृपमध्ये किशोर यांचा भाऊसुद्धा होता. भाऊ हेमंतच्या गृपचा बचाव करण्याचे प्रयत्न किशोर यांचेसोबते जवान करत होते. भावाला वाचवतांना मात्र किशोर यांना आपले प्राण गमावावे आहे.

किशोर यांचा विवाह २००२ मध्ये झाला होता. तब्बल १९ वर्षांनी किशोरच्या पत्नी गर्भवती राहिल्या आहे. किशोरच्या पत्नी चार महिन्याच्या गर्भवती आहेत. किशोर यांच्या निधनामुळे त्यांना जबर धक्का बसला आहे. किशोर यांचा गावातसुद्धा हळहळ व्यक्त केली जातेय.