सिरमचे अदर पूनावाला लवकरच भारतात परतणार

38

अदर पूनावाला यांनी ब्रिटनमधील ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, सिरम दुसऱ्या देशात आता लस उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. याबाबतची घोषणा पुढील काही दिवसांत होईल.

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.

अदर पूनावाला यांनी देशातील बड्या व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यामुळे पत्नी आणि मुलांसह ते लंडनमध्ये गेले होते. अखेर या प्रकरणी अदर पूनावालांनी भूमिका स्पष्ट केली असून, लवकरच भारतात परतत असल्याचे स्पष्ट  केले आहे.

देशांना लसपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे इतर देशांमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन सिरमने केले आहे. याबद्दलची घोषणा अदर पूनावाला लवकरच करणार आहेत.