सीरम ईन्स्टीट्युटचे केंद्राला पत्र! लस निर्मीतीत तुटवड‍ निर्माण होण्याची वर्तवली शक्यता …..

18

कोवीडशील्ड या कोरोना प्रतिबंध‍ात्मक लसीचे निर्माण करणारी कंपनी सीरम ईन्सटीट्युट अॉफ ईंडियाने थेट केंद्रा सरकारला पत्र लिहीले आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेत लागू केलेल्या ऊत्पादन सुरक्षा कायद्या या धोरणामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. हस्तक्षेप न केल्यास लसनिर्मितीत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सीरमतर्फे वर्तवण्यात आली आहे.

अमेरिकेत ऊत्पादन सुरक्षा कायदा हा नविन कायदा लागू करण्यात आला आहे. कोवीडशील्ड लसीच्या ऊत्पादनासाठी सीरम अमेरिकेतील काही कंपन्यांकडून प्राथमिक गोष्टींची अर्थात कच्च्या मालाची आयात करते. अमेरिकेतील या नविन कायद्याने या आयातीवर परिणाम होणार आहे. परिणामी केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करत काहीतरी मार्ग काढवा, अन्यथा लसीच्या ऊत्पादनात तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. असे सीरमने या पत्रात म्हटले आहे.

दि.६ मार्चला सीरम ईन्सटीट्युट अॉफ इंडियाचे वाणिज्य सचिव अनुप वधावान यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहीले आहे. यामध्ये त्यांनी वरील बाबींचा ऊल्लेख केला आहे.

कोवीडशील्ड लस ही अॉक्सफर्ड-एस्ट्रेजेनेका यांच्या संयुक्त विद्यमानाने निर्माण करण्यात आली. लसीचे ऊत्पादन पुण्यातील सीरम ईन्सटीट्युटमध्ये केले जात आहे. लसीच्या ऊत्पादनांत सीरमचे नाव संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. सीरम कोवीडशील्डचे वितरण केवळ भारतातच नव्हे तर ईतर राष्ट्रांमध्येसुद्धा करते आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नविन धोरणांत हस्तक्षेप करण्याची विनंती सीरमने भारत सरकारला केली आहे.