त्याप्रकरणी सीरमला कोर्टाकडून दिलासा

5

सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ‘कोविशिल्ड’ या करोना लसीच्या ट्रेडमार्कवरुन वाद निर्माण झाला होता. याप्रकरणात कुटिस बायोटेक’ या कंपनीने सीरम विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.
परंतू पुण्याच्या सत्र न्यायालयाकडून सीरमला दिलासा देण्यात आला आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सीरमच्या कोरोना लसीचे ‘कोविशिल्ड’ हे नाव कायम राहणार आहे. ‘

कुटिस बायोटेकने ४ जानेवारी रोजी ही याचिका दाखल केली होती. याआगोदरच कोविडशिल्ड या नावाचा वापर आमच्या कंपनीने केला आहे. त्यामुळे हे नाव वापरण्याचा अधिकार केवळ आम्हालाच आहे. कुटिस बायोटेकच्यावतीने हे स्पष्टीकरण दाखल याचिकेत देण्याय आले होते.

सीरमने यावर आपली बाजू मांडत कोर्टात सांगीतले की, दोन्ही कंपन्या भिन्न उत्पादन श्रेणीमध्ये काम करतात, त्यामुळे ट्रेडमार्कवरुन भ्रम निर्माण होण्याचे कारण नाही. अॅड. हितेश जैन यांनी याप्रकरणी सीरमतर्फे कोर्टात बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने कुटिस बायोटेकची याचिका फेटाळून लावली. मात्र, या कंपनीने कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

अॅस्ट्रजेनेका आणि अॉक्सफर्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने कोविडशिल्ड या लसीची निर्मीती करण्यात आली. सीरम ईन्स्टीट्युट या लसीचे उत्पादन करते आहे. भारतासह अन्य देशांत कोविडशिल्डच्या लसीकरणांसदेखील सुरुवात झाली आहे.