तीन दिवसात तोडगा काढा अन्यथा, हजारो शेतकरी घेऊन दिल्लीत येणार : बच्चू कडू

7

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले किसान आंदोलन अधिक तीव्र होताना पाहायला मिळतंय. दिल्लीतील हे शेतकरी आंदोलन केंद्र सरकार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय. केंद्र सरकारच्या मी ल कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणाचे शेतकरी आक्रमक होत दिल्लीत पोहोचले आहेत. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा शेतकरी आंदोलनावर ठाम होते.

या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ३ दिवसात तोडगा न काढल्यास हजारो शेतकऱ्यानं घेऊन दिल्लीला जाणार असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे.

‘केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार’, असेही मंत्री कडू म्हणाले आहे. फेसबुक पोस्ट करत कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.