किंग खान शाहरुख खान याचा आज ५५ वा वाढदिवस आहे. दरवर्षी शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मन्नत बंगल्यासमोर हजारो फॅन्स गर्दी करत असतात. मात्र यावर्षी कोरोना मुळे सगळीकडे सुरक्षित अंतर राखणं गरजेचं आहे. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी बंगल्यासमोर गर्दी करू नये असं आवाहन शाहरुख खान याने केलं आहे.
दरवर्षी शाहरुखच्या बंगल्यासमोर मोठी गर्दी पाहायला मिळते. तो सुद्धा चाहत्यांना झलक दाखवण्यासाठी बाहेर येतो. मात्र, यंदा त्याठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जरी चाहत्यांनी गर्दी केली तर पोलिस त्यांना तेथून परत पाठवतील.
शाहरुखला त्याच्या एका चाहत्यानं वाढदिवसाचे प्लॅन्स विचारले. त्यावेळी शाहरुख म्हणाला, यंदा कोरोनामुळे मन्नतबाहेर कोणीही गर्दी करु नका. माझ्या घरासमोरच नाही तर कुठेही गर्दी करु नका. इस बार का प्यार, थोडा दूरसे मेरे यार….’ असे आवाहन त्याने चाहत्यांना केलं.