पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणांत नाव पुढे आलेले वननंत्री संजय राठोड गेल्या पंधरा दिवसांपासून नॉट रीचेबल होते. अखेर मंगळवारी(दि.२२ फेबृ) ला ते सर्वांसमोर आले. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी याठिकाणी ते गेले होते. तेव्हा राठोड यांच्या समर्थकांनी त्याठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मात्र पोहरादेवी गडावरील महंत कबीरदास यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे शक्तीप्रदर्शन आता संजय राठोड यांना चांगलेच भोवले अाहे.
संजय राठोड पोहरादेवी याठिकाणी दर्शनास येणार हे कळताच राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर प्रचंड गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने याठिकाणी लोकं जमले होते. यावेळी मास्क, फीजीकल डीस्टन्सींग अशा कुठल्याही नियमांचे पालन केले गेले नाही.
दरम्यान राठोड समर्थकांच्या या शक्तीप्रदर्शनानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियमांचे पालन करण्यावे आवाहन केले असतांना त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांने हे नियम मोडलेत यावरुन मुख्यमंत्र्यांनासुद्धा टार्गेट करण्यात आले होते. या शक्तीप्रदर्शनानंतर आज महंत आणि १९ जणांची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. त्यामुळे आता राठोड यांच्या अडचणींत अधिक वाढ होणार आहे.
महंत कबीरदास यांनी २१ फेबृवारीस चाचणी केली होती. तरीदेखील ते संजय राठोड यांच्या कार्यक्रमाच्यादिवशी त्याठिकाणी ऊपस्थित होते. तो संपूर्ण दिवस महंत संजय राठोड यांच्या सोबत होते. हजारोंच्या संख्येने लोक याठिकाणी आले होते. विदर्भात पूर्वीपासूनच कोरोनाने वेग धरला आहे. आता या शक्तीप्रदर्शनानंतर रुग्णवाढीवर काय परिणाम होणार ही चिंता प्रशासनासह नागरिकांनासुद्धा लागली आहे.