पोटात दुखत असल्यामुळे शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल 

14

पोटात दुखत असल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबद्दलची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली आहे.

त्यांच्यावर एन्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल. यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

रुग्णालयात तपासणी केल्यानंतर शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. यामुळे शरद पवार यांना ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.