भाजप आणि मित्रपक्ष काँग्रेसच्याही विरोधात शरद पवार; बंगालमध्ये तृणमूलसाठी करणार प्रचार

20


पश्चिम बंगाल सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानिमित्ताने सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. पश्चिम बंगालमधील प्रचाराचा आढावा घेतला असता, मोदी शहा विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार लढाई होताना पाहायला मिळतेय.

भाजपने बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. काँग्रेस डाव्यांच्या गटात सहभागी आहे. तर एमआयएम सुद्धा आपलं नशीब अजमावत आहे. मात्र, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालची सत्ता ताब्यात घेणार असल्याची सिंहगर्जना केली आहे. त्याला आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ मिळणार असल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

१ ते ३ एप्रिल दरम्यान स्वतः शरद पवार हे ममता यांच्या तृणमुल काँग्रेससाठी बंगालमध्ये प्रचारसभा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

शरद पवार हे महाराष्ट्रात सत्तेत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या विरोधात बंगालमध्ये प्रचार करणार असल्याने मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, शरद पवार यांनी देशात भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत असताना तृणमुल साठी प्रचार करणं ही पावरांच महत्वाची खेळी अश शकते. असं बोललं जात आहे.